माझी आजी वर निबंध My Grandmother Essay in Marathi

माझी आजी वर निबंध My Grandmother Essay in Marathi: माझ्या आजीचे नाव श्रीमती सुशीला राणी आहे. ती एक वृद्ध महिला आहे. तिचे सध्या वय हे जवळपास 100 वर्षांच्या आसपास आहे. तिचे इतके वय झालेले असले तरी देखील ती अजूनही तंदुरुस्त आणि निरोगी आहे. तिला तिचा जन्म कधी झाला हे माहीत नाही. तिने कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही.

माझी आजी वर निबंध My Grandmother Essay in Marathi

माझी आजी वर निबंध My Grandmother Essay in Marathi

तिचे केस चांदी सारखे शुभ्र आहेत. तिचे आता सर्व दात पडले आहेत. तिला आता डोळ्यानी जास्त काही दिसत नाही. तिच्या डोळ्यांवर चष्मा जरी असला तरी देखील तिला तितक्या चांगल्या प्रकारे आता दिसत नाही. तिला प्राणी खूप आवडतात. तिने एक मांजर देखील पाळलेली आहे. ती त्या मांजराची खूप काळजी घेते.

ती सतत आपल्या मुखातून काहीतरी गुणगुणत असते. आम्हाला नेहमी अस वाटत की ती देवाचे नामस्मरण करत असावी. ती एक न शिकलेली स्त्री आहे. ती खूप अंधश्रद्धा पाळणारी आहे. तिला देवावर खूप जास्त मात्र भोळा विश्वास आहे. ती सकाळी आणि सायंकाळी दररोज नित्यानियम ठेवून देवाची पूजा करते.

ती खूप दुर्बल असून आता तिला चालण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागतो. काठी घेऊन देखील ती आता जास्त चालू शकत नाही. ती म्हणते की आता ती मंदिरात जाण्याच्या योग्य देखील नाहीये. ती तिचा अधिकाधिक वेळ आता झोपूनच घालवत असते. तिला अनेक व्याधींनी जखडले आहे. कधी कधी तिला खूप जोराचा खोकला देखील होतो.

कधी कधी तिला पायांवर, पोटात किंवा डोक्यात खूप जोरदार त्रास देखील जाणवतो. मात्र तिच्याकडे सहनशीलता खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेव्हा तिला काही त्रास होत असतो तेव्हा ती रडणे किंवा ओरडण्याऐवजी देवाची प्रार्थना करत असते. तरी देखील क्वचितच तिने कधी तरी बालपण आणि तरुणपण आठवून स्वताला त्रास करून घेतला असेल.

हे खूप आश्चर्यकारक आहे की जरी तिची आठवण्याची क्षमता कमी झालेली असली तरी सुद्धा जीवनातील काही महत्वाच्या घटना तिला अजूनही स्पष्टपणे आठवतात. जरी ती शिकलेली नसली तरी सुद्धा मी अभ्यासात लक्ष द्यावं आणि चांगले मार्क मिळवावे यासाठी माझ्याशी ती सतत बोलत असे.

अजूनही तिला संपूर्ण मनुष्य जीवनावर प्रेम आहे. मात्र तिचे सर्वाधिक प्रेम हे माझ्यावर आहे. ती माझ्यावर प्रेम करते आणि मला आपुलकीने जवळ देखील घेते. मी देखील माझ्या आजिवर खूप प्रेम करतो. मी तिला तिच्या कामांसाठी आणि चालण्यासाठी आधार म्हणून मदत करतो. मला असे वाटते की तिने अजून काही वर्षे जगावे आणि माझ्यावर असेच प्रेम करत राहावे.
About Author: