माझी बहिण वर निबंध My Sister Essay in Marathi

माझी बहिण वर निबंध My Sister Essay in Marathi: मला एक मोठी बहीण आहे आणि तिचे नाव मारिया आहे. ती मेडिकल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती खूप हुशार विद्यार्थी आहे. अगदी लहानपणी पासून तिने नेहमीच उत्तम आणि उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. तिला लहानपणी डॉक्टर बनायचे होते तिची मेहनत म्हणजे आज ती मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. तिने यासाठी खूप मेहनत घेतली होती. मेडिकल प्रवेश घेण्यासाठी तिने रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्यामुळे ती आज तिचे ध्येय गाठण्यासाठी प्रगतिशील आहे.

माझी बहिण वर निबंध My Sister Essay in Marathi

माझी बहिण वर निबंध My Sister Essay in Marathi

ती सर्वांसाठी उपयुक्त आहे कारण ती सर्वांना नेहमी मदत करते. जेव्हा कधी मला माझ्या अभ्यास विषयक प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तेव्हा मी तिच्याकडे शंका घेऊन जातो. ती माझ्या सर्व शंका आणि समस्या सोडविते. मला अनेकदा गणित विषयावर प्रश्न असतात आणि तिला गणित विषय खूप चांगल्या प्रकारे जमतो. माझी बहिण माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. माझ्या पालकांकडून मिळालेली ती सर्वात चांगली भेट आहे. आम्ही एकत्रच राहिलो आणि एकत्रच वाढलो. ती देखील मला चांगल्यापैकी समजून घेते आणि माझ्या मनात देखील तिच्याविषयी चांगली समजूत आहे.

फक्त अभ्यासच नाही तर तिच्यामध्ये इतरही कलागुण आहेत. तिचा आवाज सुंदर आहे आणि ती सुंदर गाते देखील. आमच्या परिसरात होत असणाऱ्या प्रत्येक उत्सवात तिचे गाणे हे ठरलेले असते. शालेय जीवनात तो नृत्य करण्यात देखील उत्तम निपुण होती. तिला गिटार वाद्य देखील अगदी उत्तम प्रकारे वाजविता येते. तिच्याकडे गिटार वाद्य आहे. अनेकदा आम्ही आमच्या छतावर जाऊन बसतो तेव्हा ती गिटार वाजविते.

तिच्या इतका मनमिळावू स्वभाव अजून मी कुनामध्ये बघितला नाही. माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगण्याचे ठिकाण म्हणजे माझी बहिण, जस मी तिला सांगतो तसेच ती सुद्धा सगळे काही मला सांगते. मला तिच्यासोबत माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी शेअर करायला आवडते. आमच्यात कधीही वाद होत नाहीत. आमच्यात एक प्रकारे परस्पर समजूत निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट आमच्या भावा बहिणीच्या नात्याच्या पलीकडे आहे.

आम्ही चांगले मित्र आहोत. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. माझ्या संपूर्ण आयुष्यात असलेली सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी बहिण आहे. कदाचित मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही.




About Author: